Posts

Showing posts with the label exam

'मार्क' म्हणजेच गुणवत्ता नाही !

अतिशय सुरेख आणि सूज्ञ पालकांसाठी डोळे उघडणारा झणझणीत लेख: 'मार्क'म्हणजेच गुणवत्ता नाही! डॉ. अरुण नाईक, (मानसोपचारतज्ञ) - नुकतीच एक बातमी वाचली.... नेहमी चांगले मार्क मिळवणाऱ्या मुलीला दहावीचा पहिला पेपर चांगला नाही गेला. संध्याकाळी तिने आत्महत्या केली. अजून परीक्षाही संपली नाही. पण मुलगी संपली. मागे एका मेडिकलच्या विद्यार्थ्यांने शेवटच्या वर्षांला गोल्ड मेडल ऐवजी सिल्वर मेडल मिळाले, म्हणून आत्महत्या केली होती. माणूस मरायला घाबरत नाही, पण किंमतशून्य जगायला घाबरतो. एका नामांकित शाळेच्या स्कॉलर वर्गातील मुलांशी बोलताना मी त्यांना विचारले की, "सर्वजण त्यांना काय म्हणतात?" मुले म्हणाली, की 'स्कॉलर'. मी विचारले 'का?', मुले म्हणाली, "कारण आम्हाला चांगले मार्क मिळतात." मी समीकरण मांडले. 'अ = ब' व 'ब = क' त्याअर्थी 'अ = क'. म्हणजेच, 'मी = स्कॉलर' व 'स्कॉलर = मार्क'. याचा अर्थ 'मी = मार्क'. जेव्हा आपण आपली किंमत मार्कावरून करायला लागतो, तेव्हा जरा मार्क कमी मिळाले की, आपली कि