रिसेशन

रिसेशन
कलयुगात एकदा सॉफ्टवेर इंजीिनअर फार मातले
पांढरपेस्यया समाजाला पार रसातळाला घातले
देवाने मग घातली काठी ह्यांच्या पाठी
उतरवला ह्यांच्या झट क्यात माज
रिसेशनच्या काठीला मित्रा नाहीये आवाज
रिसेशनच्या काठीला मित्रा नाहीये आवाज . . .

शुलक गोष्टिला ला हे लोक ५०० ची नोट काढायचे
कारण ह्यांचे पगार ६ मिहिन्यत लाखाने वाढायचे
संतापुन म्हहणायचे, ताबडतोब ( इ यम आय वर) कार घ्यायचीय मला
कारण म्हणाल तर, काल म्हणे पी यम टी ला ५ मिनट लेट झाला
शेअरिन्ग्च्या गाडेतुन ऑफीसात हेच लोक येतात आज
रिसेशनच्या काठीला मित्रा नाहीये आवाज
रिसेशनच्या काठीला मित्रा नाहीये आवाज . . .

२ बी यच के ला हे लोक कोंडवाडा म्हणायचे
चाळीतल्या या लोकांना " लो क्लास म्ह्ध्ये " गणायचे
होम लोनचे हफ्तें आणि यल आय सी चे प्रीमियम भरायला आज
बापाला पैसे मागायला याना वाटत नाही लाज
रिसेशनच्या काठीला मित्रा नाहीये आवाज
रिसेशनच्या काठीला मित्रा नाहीये आवाज . . .

यच वन किव्वा यल वन भेटला की भेटायचा ह्याना मोक्ष
सेंसेक्स च्या आकदयां वर ह्यांच रात्रं दिवस लक्ष्य
आयुष्य जगण्याची यांची कौन जाने ही कसली साईट
येथे प्रत्येकाल जायचय एकदातरी ऑनसाइट
ह्याना हवेत चढवणारही मार्केट होत
जमीनीवर आदळणारही मार्केट आहे धोकेबाज
रिसेशनच्या काठीला मित्रा नाहीये आवाज
रिसेशनच्या काठीला मित्रा नाहीये आवाज . . .

हे रिसेशन काय म्हणतय जरा िनट ऐकु न बघा
ध्यवर्गीय माणसासारख काही काळ तरी जगा
सॉफ्टवेर च्या बाहेर ही जग आहे अथांग
आणि सॉफ्टवेर आहे रिसेशन छिद्र पडलेलं जहाज
रिसेशनच्या काठीला मित्रा नाहीये आवाज
रिसेशनच्या काठीला मित्रा नाहीये आवाज . . .

अनंतसुत . . .

Comments

Popular posts from this blog

Greate programming Quotes

A Story of Love

small changes can make a lot of difference