तो एक मूर्ख

अनोळखी लिंक वर
सांगूनही
जो क्लीक करतो
तो एक मूर्ख ||
.
आपला पासवर्ड
मित्रांना
सांगून देतो
तो एक मूर्ख ||
.
ऑनलाईन लिहिलेले
सगलेच खरे
समजून घेतो
तो एक मूर्ख ||
.
फुकट स्माईली
हव्यासाने
इन्स्टाल करतो
तो एक मूर्ख ||
.
महिनोंमहिने
पासवर्ड आपला
तसाच ठेवतो
तो एक मूर्ख ||
.
एंटीव्हायरस
म्हणजे वेळेचा
अपव्यय म्हणतो
तो एक मूर्ख ||
.
आपला अकाउंट
हॅकच होणार
नाही, समजतो
तो एक मूर्ख ||
.
सगळे वाचून
समजून
गमतीवारी नेतो
तो एक मूर्ख ||

Tushar Joshi, Nagpur

Comments

Popular posts from this blog

MIUI 7.5.5.0 upgrade to 7.5.9.0 Malmide Problem with VoLTE Solution in Red MI 3S Prime

matru ki bijli ka mandola 2013 lyrics