म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाहि .....

म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाहि .....

कितिहि सुदर मुलगी दिसली तरी,
तीचि स्तुति करुन तिला
हरबरयाच्या झाडावर चढ्वायला
आम्हाला कधि जमलेच नाहि
म्हणुन आम्हाला प्रेम ...

कोणाच्या मागे शिट्ट्यामारत फिरन
आमच्या तत्वात कधि बसलेच नाहि
म्हणुन आम्हाला प्रेम ..

कोणिजर आवड्लिच तर
स्वतः हुन गप्पांना सुरवात करायला
आम्हाला कधि जमलेच नाहि
म्हणुन आम्हाला प्रेम ..

दुसरयाचे विचार ऎकत असतांना
आपले विचार मांडण्याचि संधि
आम्हाला कधि साधताच आलि नाहि
म्हणुन आम्हाला प्रेम ..

कधि हिंमत करुन कोणाला जर विचारलेच
तर मी तुला त्या द्रुषटिनि कधि बघितलेच नाहि
यावेतिरिक्त दुसरे काहि
आम्हाला ऎकायलाच मिळाले नाहि
म्हणुन आम्हाला प्रेम ...

प्रेमात नाहिचा अर्थ हो असतो
हे गणित आम्हाल कधि समजलेच नाहि
म्हणुन आम्हाला प्रेम ..

फुलपाखरा प्रमाणे आम्हि हि
बरयाच सुदर फुलां मधे वाव्ररत होतो
पण जाउन बसन्यासारखे फुल
अजुन आम्हाला दिसलेच नाहि
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाहि

Comments

Popular posts from this blog

तो एक मूर्ख

New Education Policy of India: Moving towards a brighter future

MIUI 7.5.5.0 upgrade to 7.5.9.0 Malmide Problem with VoLTE Solution in Red MI 3S Prime